तुंगणदिगर गावाची माहिती
तुंगणदिगर हे गाव नाशिक पासून उत्तरेस 120 किलोमीटर व सटाणा पासून उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर आहे. तुंगणदिगर हे गाव धुळे साक्री सीमेवर असून या गावाच्या पूर्वेस दसवेल पश्चिमेस भिलवाड दक्षिणेस अंतापुर ही गावे आहेत. या गावाजवळ मांगीतुंगी डोंगर असून या गावाचे नाव तुंगी डोंगराच्या नावावरून तुंगणदिगर असे पडलेले असावे असे जाणकार सांगतात. गावात संपूर्ण आदिवासी लोक राहत असून या गावात दोन पाडे आहेत. तुंगणदिगर व तुंगणपाडा हे दोन पाड्यांची लोकसंख्या 1469 आहे. त्यात स्त्रिया 730, पुरुष 739 व कुटुंब संख्या 253 आहे. तसेच गावात संपूर्ण लोक शेती करत असून या ठिकाणी मुख्य पीक कांदा बाजरी गहू हरभरा हे आहेत.